Mahesh Gaikwad
माणसांपेक्षाही जास्त प्रामाणिक, निष्ठावान आणि प्रेम करणारा प्राणी म्हणजे कुत्रा. हा असा प्राणी आहे, जो थोडसं खायला दिलं तरी आपल्या मालकांवर जीव ओतून प्रेम आणि त्याचं रक्षण करतो.
भारतात श्वानांच्या अनेक जातीवंत प्रजाती आहे. पूर्वी श्वानांचा उपयोग घराच्या आणि शेताच्या राखणीसाठी तसेच शिकारींसाठी केला जायचा.
पण काळ बदलला तसा देशी श्वानांची जागा ग्रेटडेन सारख्या मोठ्या पग सारख्या अतिशय लहान प्रजातींनी घेतली.
अलिकडच्या काळात घरामध्ये श्वान संगोपनाचा ट्रेंड आला आहे. पूर्वी मात्र ग्रामीण भागात विशेषत: शेती आणि घराच्या राखणीसाठी श्वानांचा वापर केला जात असे.
शहरांमध्ये आजही विदेशी प्रजातींच्या श्वानांचे संगोपन केले जात असले तरी ग्रामीण भागात आजही देशी आणि गावठी श्वानांच्या जातींचे संगोपन केले जाते.
रात्री अपरात्री शेतात एखादे जनावर किंवा चोर घुसले तरी त्याला हुसकून लावण्यासाठी शेतकऱ्याच्या आधी पुढे पळणारा श्वानच असतो.
ग्रामीण भागात आजही रात्रीच्या वेळी शेतात शेतकऱ्यांना श्वानांचा सुरक्षेसाठी आधार वाटतो. त्यामुळे कुत्रा हाच शेतकऱ्यांचा खरा सोबती आहे.