Indian Dog Breed : देशी श्वानांच्या विविध प्रजाती तुम्हाला माहितीयेत का?

Team Agrowon

रामपूर हाऊंड - उत्तर भारतातील ही शिकारी प्रजाती आहे. हे श्वान निमुळत्या बांध्याचे असते. याचे वजन साधारणत: २० ते ३० किलोपर्यंत असते.

Rampur Hound Dog | Agrowon

बंजारा - या प्रजातीच्या श्वानांना ताजी किंवा सनेहता या नावानेही ओळखतात. या श्वानांची खांद्यापर्यंत उंची ४० ते ६० सेंटीमीटर इतकी असून वजन २० ते ३० किलो असते. या प्रजातीचे वर्गीकरण हाऊंड प्रकारात केले जाते.

Banjara Dog | Agrowon

राजपालयम - या प्रजातीचे मूळ स्थान केरळ राज्यातील राजपालयम या गावातील आहे. हे शिकारी आहे. हे श्वान फिक्कट पांढऱ्या रंगाचे असून उंच लांबलचक व सडपातळ असतात.

Rajpalayam Dog | Agrowon

हिमालयन श्वान - अत्यंत दाट व मऊ केस अंगभर असलेली ही प्रजाती हिमालय पर्वत रांगांमध्ये आढळते. मेंढी पालनासाठी संरक्षक म्हणून या श्वानांचे संगोपन केले जाते. या प्रजातीचे वैशिष्ट म्हणजे छातीवर डौलदार पांढऱ्या केसांचा गुच्छ.

Himalayan Dog | Agrowon

कारवान - या प्रजातीची उत्पत्ती महाराष्ट्रातील दख्खन पठारापासून झालेली आहे. या श्वानांच्या छातीचा भाग रुंद तर कंबर निमुळती असते. श्वान हडकुळे दिसतात.

Caravan Dog | Agrowon

पश्मी - या प्रजातीचे श्वान हाउंड प्रकारातील आहेत. यांचे कान मुधोळ किंवा कारवानपेक्षा मोठे व झुपकेदार असतात. शेपटी, पायावर सुद्धा केसांचे झुपके आढळतात.

Pashmi Dog | Agrowon

कुंबई - दक्षिण भारतात सापडणारी ही प्रजात राजपालयम प्रजाती पेक्षा उंचीने कमी पण अधिक भारदस्त दिसते. प्रजातीचा रंग लाल किंवा बदामी रंग असतो. जबडा अत्यंत शक्तीशाली असतो.

Kombai Dog | Agrowon

चिप्पीपारी - ही दक्षिण भारतातील विशेषतः केरळमधील हाऊंड प्रकारातील प्रजात आहे. यांचा बांधा निमुळता असतो. शरीर लांबलचक असते. शिंपल्यासारखा चकाकणारा रंग असणाऱ्या श्वानांना अधिक मागणी आहे.

Chippipari Dog | Agrowon

कान्नी - तमिळनाडू राज्यातील मदुराईमधील ही प्रजाती आहे. हे श्वान काळ्या रंगाचे असतात. दुधाळ, काळपट, चॉकलेटी रंग असतो. या प्रजातीचे श्वान कमी झाले आहेत.

Kanni Dog | Agrowon

भुतिया - या प्रजातीचे भुतिया आणि बुली असे मुख्य दोन प्रकार पडतात. या प्रजातीचे उत्पत्तिस्थान हिमालयाच्या पर्वत रांगा असले तरी हे श्वान उष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये देखील जोमाने वाढताना दिसतात.

Bhotiya Dog | Agrowon

गद्दी - या श्वानाचा उगम उत्तर प्रदेशातील मेरठ प्रांतातील जंगली श्वानांपासून झाल्याचे समजते. या प्रजातीचा समावेश केसाळ जातींमध्ये करतात.

Gaddi Dog | Agrowon
Strawberry Season | Agrowon