Anuradha Vipat
कुत्र्याने चावल्यास रेबीज सारख्या भयंकर आणि प्राणघातक आजाराचा धोका टाळण्यासाठी पहिल्या १५ मिनिटांत केलेले प्रथमोपचार अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
कुत्र्याने चावलेल्या जागेवर नळाचे वाहते पाणी धरा आणि कोणत्याही कपडे धुण्याच्या किंवा अंगाच्या साबणाने जखम कमीत कमी १५ मिनिटे चांगली धुवा.
जखम स्वच्छ धुतल्यानंतर आणि सुकवल्यानंतर त्यावर डेटॉल , सॅव्हलॉन किंवा बिटाडिनसारखे अँटीसेप्टिक लिक्विड किंवा मलम लावा.
कुत्र्याने चावलेली जखम कधीही घट्ट बांधू नका किंवा त्यावर बँडेज लावू नका. ती उघडी राहू द्या.
जखमेवर मिरची पूड, हळद, चुना, तेल, माती किंवा कोणतेही अघोरी उपाय करू नका.
प्रथमोपचार झाल्यानंतर २४ तासांच्या आत जवळच्या शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटी-रेबीज व्हॅक्सिनचा संपूर्ण कोर्स पूर्ण करा. जखम गंभीर असल्यास डॉक्टर 'इम्युनोग्लोब्युलिन' चे इंजेक्शन देखील देतात.