Anuradha Vipat
हो, विज्ञानानुसार उशिरा झोपल्याने शरीर वेगाने म्हातारे होऊ शकते.
उशिरा झोपल्याने शरीरात 'कॉर्टिसॉल' नावाचे स्ट्रेस हार्मोन वाढते, जे कोलाजन नष्ट करते. यामुळे अकाली सुरकुत्या आणि त्वचा निस्तेज दिसू लागते .
पुरेशी झोप न घेतल्यास पेशींमधील डीएनएची दुरुस्ती नीट होत नाही, ज्यामुळे पेशींचे वय नैसर्गिक वयापेक्षा जास्त वेगाने वाढू लागते
उशिरा झोपल्याने मेंदूतील 'टॉक्सिन्स'बाहेर काढण्याची प्रक्रिया मंदावते.
सतत उशिरा झोपल्याने हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो, जे शरीर आतून पोखरून म्हातारे करतात.
उशिरा झोपल्याने झोपेत आपल्या शरीरात होणारी 'दुरुस्ती प्रक्रिया' विस्कळीत होणे.
उशिरा झोपल्याने स्मरणशक्ती कमी होणे आणि एकाग्रता न लागणे यांसारखे 'वयस्कर' लक्षणे तरुणपणीच दिसू शकतात