Papaya Benefits : पपई खाल्ल्याने मासिक पाळी काळातील त्रास आणि हार्मोन्स संतुलन राहतं का?

sandeep Shirguppe

पपई

चव, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी पपई या फळाचे खूप फायदेशीर गुणधर्म आहेत.

तंतूमय घटक

पपईमध्ये तंतूमय घटक, कॅल्शिअम, पोटॅशियम, मॅग्नेशिअम आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात.

जीवनसत्व अ, ब, क

जीवनसत्त्व अ, ब, क आणि ई भरपूर प्रमाणात आहे. रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

कोलेस्टेरॉल धोका कमी

जीवनसत्त्व क आणि तंतूमय घटकांचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्याचा धोका टळतो.

मधुमेहींना हितकारी

चवीला गोड असली तरीदेखील रक्तातील साखर वाढत नाही. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे.

डोळ्याचे आरोग्य

जीवनसत्त्व अ मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे.

मासिक पाळी

अनियमित मासिक पाळी तसेच मासिक पाळीच्या काळातील त्रास दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.

कर्करोगापासून संरक्षण

ॲन्टीऑक्‍सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून संरक्षण करते. बीटा कॅरोटीन आतड्यांच्या कर्करोगापासून संरक्षण करते.

हार्मोन्स संतुलन

दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा कमी होतो. तसेच शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राहते.

आणखी पाहा...