Weight Loss Tips : रात्रीच्या जेवणात करा हे बदल; वजन वाढण्याची चिंता होईल कायमची दूर

Anuradha Vipat

रात्रीचे जेवण

फक्त रात्रीचे जेवण केल्याने वजन वाढत नाही, तर तुम्ही रात्रीच्या जेवणात काय खाता, किती प्रमाणात खाता आणि कधी खाता यावर वजन वाढणे किंवा कमी होणे अवलंबून असते

Weight Loss Tips | Agrowon

थेट संबंध

वजन वाढण्याचा थेट संबंध 'कॅलरी इन व्हर्सेस कॅलरी आउट' या सिद्धांताशी असतो.

Weight Loss Tips | Agrowon

वजन

जर तुम्ही दिवसभर संतुलित आहार घेतला, तर रात्रीचे जेवण केल्याने वजन वाढत नाही.

Weight Loss Tips | Agrowon

रात्री उशिरा जेवणे

रात्री खूप उशिरा जेवल्याने शरीराचे जैविक घड्याळ विस्कळीत होते. यामुळे चयापचय क्रिया मंदावते आणि अन्न पचण्यास त्रास होतो, ज्यामुळे चरबी वाढू शकते.

Weight Loss Tips | Agrowon

जेवल्यानंतर लगेच झोपणे

जेवल्या जेवल्या लगेच झोपल्यास कॅलरीज बर्न होत नाहीत आणि ॲसिड रिफ्लक्ससारख्या पचनाच्या समस्या उद्भवतात.

Weight Loss Tips | Agrowon

कॅलरीचे जास्त प्रमाण

अनेकदा लोक रात्रीच्या वेळी अनवधानाने जास्त कॅलरी असलेले, जड किंवा तळलेले पदार्थ खातात, ज्यामुळे वजन वाढते.

Weight Loss Tips | Agrowon

योग्य पद्धत

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रात्रीचे जेवण संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान करावे आणि जेवण हलके व प्रथिने आणि फायबरयुक्त असावे.

Weight Loss Tips | Agrowon

Jaundice Recovery : कावीळ झाल्यास यकृत निरोगी ठेवण्यासाठी 'हा' आहार ठरेल अत्यंत फायदेशीर

Jaundice Recovery | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...