sandeep Shirguppe
सीताफळ आपल्या शरिराला अनेक प्रकारे निरोगी ठेवण्याचे काम करत असतं, सीताफळाचा विशेष डोळ्यांना फायदा होतो.
यामध्ये लोह, कॅल्शिअम, प्रथिने, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी इत्यादी पोषकघटकांचे विपुल प्रमाण आढळून येते.
सीताफळाचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते आणि मधुमेहापासून आराम मिळण्यास मदत होते.
सीताफळामध्ये मुबलक प्रमाणात फायबर्सचे प्रमाण आढळते. या फायबर्समुळे पचनसंस्था तंदूरूस्त राहते.
पोटातील गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि जुलाबाचा वारंवार त्रास होत असेल तर सीताफळाचे जरूर सेवन करा.
सीताफळ हे आपल्या डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. सीताफळामध्ये ल्यूटीन नावाचे पोषकतत्व आढळते.
सीताफळात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आढळते यामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांच्या कार्यास प्रोत्साहन देते.
विशेष म्हणजे चवीला जरी हे फळ गोड असले तरी याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा फार कमी आहे.