sandeep Shirguppe
आजकाल, एअरपॉड्स हे बहुतेक लोकांसाठी एक आवश्यक गॅझेट आहे. मोबाइलचा आवाज थेट त्यांच्या कानापर्यंत पोहोचण्यासाठी लोक एअरपॉडचा वापर करतात.
एअरपॉड एक वायरलेस गॅझेट आहे. सध्या बरेच लोक एअरपॉड्स वापरतात. पण या रेडिएशनमुळे कॅन्सरही होऊ शकतो का?
इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे ब्रेन ट्युमर किंवा कॅन्सरचा धोका असल्याचे सांगितले जाते तर कधी काही संशोधनात हे नाकारले जाते.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे कर्करोग, मेंदूशी संबंधित समस्या, पुरुषत्वाच्या समस्या, स्मरणशक्ती कमी होणे इत्यादी समस्यांचा धोका असतो यात शंका नाही.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या मते, मोबाईल फोन आणि वायरलेस उपकरणांमुळे कर्करोग होऊ शकतो.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनबद्दल चिंता व्यक्त केली जात असताना, एअरपॉड्समुळे ब्रेन ट्यूमर होतात याचा कोणताही पुरावा नाही.
नगण्य धोका आहे असे गृहीत धरून वापरकर्ते ते वापरू शकतात. परंतु जर तुम्ही एअरपॉड्स वापरताना काही मार्गदर्शक तत्त्वे पाळली पाहिजेत.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या म्हणण्यानुसार, ब्लूटूथ इअरफोनमधून बाहेर पडणाऱ्या रेडिओफ्रिक्वेंसी वेव्स खूप कमी असतात.
रोम विद्यापीठाचा अभ्यास देखील एअरपॉड्स आणि ब्रेन ट्यूमर यांच्यात कोणताही थेट संबंध स्थापित करू शकला नाही.