Anuradha Vipat
झक्कास रेसिपी वापरून तुम्ही घरीच हॉटेलसारखे चविष्ट चिकन लॉलीपॉप बनवू शकता.
चला तर मग आज आपण या लेखात झक्कास चिकन लॉलीपॉप रेसिपी पाहूयात.
चिकन लॉलीपॉप , आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला, लिंबू रस ,मीठ , कॉर्नफ्लॉवर, मैदा, तेल.
भांड्यात चिकन लॉलीपॉप घेऊन त्यात आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला, लिंबू रस, आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकत्र करा.
१-२ तास चिकनचे तुकडे मॅरीनेट होण्यासाठी ठेवा.
मॅरीनेट केलेल्या चिकनमध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालून व्यवस्थित मिक्स करा.
तेल चांगले तापल्यावर, चिकन लॉलीपॉप मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळा.