Navalkol Vegetable : तुम्ही खाल्लीय का नवलकोल भाजी? ; आरोग्यासाठी फायदेशीर

Mahesh Gaikwad

पिझ्झा, बर्गर

पिझ्झा, बर्गर या सारख्या पदार्थांमध्ये अनेक विदेशी भाज्या वापल्या जातात. कोबीसारख्याच दिसणाऱ्या लेट्यूस, ब्रोकली या भाज्याही या पदार्थांमध्ये वापरल्या जातात.

Navalkol Vegetable | Agrowon

विदेशी भाज्या

अलिकडच्या काळात विदेशी भाज्या खाण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. नवलकोल ही भाजीही त्यापैकीच एक आहे.

Navalkol Vegetable | Agrowon

सलाड

आरोग्याच्या दृष्टीने सलाड म्हणून कच्च्या भाज्या खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. नवलकोल ही भाजीसुध्दा सलाड म्हणून किंवा त्याची करून खाल्ली जाते.

Navalkol Vegetable | Agrowon

कोबीवर्गीय भाजी

नवलकोल ही भाजी कोबीवर्गीय असून दिसायला ही कोबीप्रमाणेच असतो. अलिकडच्या काळात या भाजीची लागवड महाराष्ट्रातही काही प्रमाणत होत आहे.

Navalkol Vegetable | Agrowon

युरोपातील भाजी

परदेशी असलेली नवलकोल भाजी ही मूळची युरोपातील आहे. आहारासोबतच या ही भाजी खाण्याचे आरोग्यासाठीचे फायदेही अनेक आहेत.

Navalkol Vegetable | Agrowon

नवलकोलची लागवड

नवलकोल भाजीचे पीक प्रामुख्याने थंड हवेच्या ठिकाणी चांगले येते. देशातील अनेक राज्यांमध्ये या भाजीची लागवड केली जाते.

Navalkol Vegetable | Agrowon

लोणचे

नवलकोल भाजी जेवणासोबत सलाड म्हणूनही खाल्ली जाते. तसेच या भाजीपासून बरेच दिवस टिकणारे लोणचेही तयार करतात.

Navalkol Vegetable | Agrowon

वजन कमी करणे

वजन कमी करण्यासाठीही आहारात या भाजीचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच अन्न पचनासाठी सुध्दा याचा फायदा होतो.

Navalkol Vegetable | Agrowon