sandeep Shirguppe
बहुतांशजण मका खाताना त्याच वरच आवरण काढताना त्याला असलेलं केस म्हणजे कॉर्न सिल्क फेकून देतात.
यातील फायबर्स पचनक्रिया सुधारतात आणि फायटोकेमिकल्स अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात.
तर त्याचे केस म्हणजेच कॉर्न सिल्क हे पोटॅशियम, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे B2, C आणि K सारख्या मुख्य पोषक तत्वांनी समृद्ध असतात.
कॉर्न सिल्कमध्ये स्टग्मास्टरोल आणि सिटेस्टेरोल तत्त्व असतात. हृदयरोग आणि कोलेस्ट्रॉलपासून बचाव करतात.
कॉर्न सिल्कमध्ये इंसुलिन हार्मोन नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म असतात ज्यामुळे मधुमेह रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
किडनीच्या समस्येवर अनेक उपाय करुन थकला असेल तर हा एक घरगुती उपाय करा ज्याच्यामुळं ही समस्या दूर होईल.
कॉर्न सिल्कमध्ये कॅलरी कमी असतात, ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते.
कॉर्न सिल्क खाण्याची कोणतीही पद्धत नाहीये. त्यामुळं तुम्ही त्याचा चहा बनवु शकता. एका भांड्यात पाणी उकळा आणि त्यात ताजे कॉर्न सिल्क टाका.
काही मिनिटे हे चांगलं उकळू द्या आणि थंड होऊ द्या. काही वेळाने या चहाला खाकी रंग येईल. त्यानंतर हा चहा गाळून घेऊन प्या.