Potato : भारतीय जेवणात बटाटा कसा आला माहितेय का?

Mahesh Gaikwad

भारतीय जेवण

बटाटा हा भारतीयांच्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. प्रत्येक भारतीय घरामध्ये जेवणात हमखास बटाट्याचा वापर केला जातो.

Potato | Agrowon

बटाट्याची भाजी

कोणत्याही भाजीसोबत सहज वापरली जाणारी दुसरी भाजी म्हणजे बटाटा. बटाट्याची भाजी, पदार्थ आवडत नाही, असे खूप कमी लोक असतील.

Potato | Agrowon

बटाटा उत्पादन

भारतातील शेतकरी दरवर्षी जवळपास २६० लाख टन एतक्या बटाट्याचे उत्पादन घेतात. त्यातही बटाट्याचे सर्वाधित उत्पादन पश्चिम बंगालमध्ये होते.

Potato | Agrowon

बटाट्याचे मूळ

पण प्रत्येक भाजीमध्ये दिसणारा बटाटा मूळचा भारतातील नाही, हे तुम्हाला माहित आहे का? हो हे खरं आहे. कारण बटाटा हा परदेशातून भारतात आला आहे.

Potato | Agrowon

इतिहासातील संदर्भ

५०० वर्षांपूर्वीपर्यंत भारतात बटाटा नव्हता. भारतात बटाटा आल्याचे अनेक संदर्भ आहे. इतिहासातील संदर्भानुसार, भारतात बटाटा प्रथन जहांगीरच्या काळात आला.

Potato | Agrowon

पोर्तुगीज व्यापारी

पोर्तुगीज आणि डच व्यापाऱ्यांनी भारतात बटाटा आणल्याचेही म्हटले जाते.

Potato | Agrowon

बटाट्याला प्रोत्साहन

भारतात बटाट्याला प्रोत्साहन देण्याचे श्रेय वॉरेन हिस्टिंग्स यांनाही दिले जाते. १७७२ ते १७८५ या कालावधित हिस्टिंग्स भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होते.

Potato | Agrowon

बटाट्याचा प्रचार

परंतु युरोपियन व्यापाऱ्यांनी भारतीयांना बटाट्याचे व्यसन लावले आणि त्याचा प्रचार प्रसारही केला.

Potato | Agrowon

बटाट्याटा तुटवडा

१८ व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीला बटाट्याचा तुटवडा जाणवू लागल्याने बटाटे आयात करण्याऐवजी भारतातच उत्पादित करण्याचे ठरविले.

Potato | Agrowon

बटाट्याची रोपे

ईस्ट इंडिया कंपनीने शेतकऱ्यांना बटाट्याचटी रोपे दिली. त्यानंतर १८ व्या शतकापर्यंत संपूर्ण भारतात बटाटा पसरला होता.

Potato | Agrowon