sandeep Shirguppe
पपई खाल्ल्यानंतर आपण त्याची साल फेकून देतो. पण, या पपईच्या सालीचे अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत.
पपईच्या सालीचे त्वचेच्या सौंदर्यासह चेरी करण्यासाठीही उपयोग केला जातो.
पपई खाल्ल्यानंतर त्याची साल वाळवून त्या पावडरमध्ये मध, लिंबू, हळदीचे मिश्रण चेहऱ्यावर अत्यंत प्रभावी आहे.
पपईची साल वाळवून तिची बारीक पावडर करून एका हवा बंद डब्यात ठेवून रोजच्या वापरात घेऊ शकता.
केसांसाठीही पपई अतिशय फायदेशीर आहे. दोन आठवड्यातून एकदा पपई खायला हरकत नाही.
पपईच्या सालीमध्ये पाण्याचे प्रमाण आणि पोषक घटक असतात जे त्वचेला हायड्रेट आणि पोषण देऊ शकतात.
पपईची साल चेहऱ्यावर २ मिनिटे चोळा आणि सर्वोत्तम परिणामांसाठी थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
पिकलेली, मॅश केलेली पपई चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या मृत पेशी हळुवारपणे निघून जातात.