Roshan Talape
रोजच्या आहारात सकाळ-संध्याकाळ फक्त चपाती खाण्याची सवय आहे, तर ही सवयीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
फक्त चपाती खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळत नाहीत. यामुळे थकवा येतो, शरीर कमजोरी होते आणि रोगांना प्रतिकार कमी होतो.
गव्हाची चपाती खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
जेवताना दोन्ही वेळेस फक्त चपाती खाल्ल्यामुळे वजन संतुलित राहत नाही आणि यामुळे वजन वाढू शकते.
चपातीचे जास्त सेवन केल्यास पचनात अडचणी येतात. यामुळे अन्न योग्यरित्या पचत नाही आणि पोटात गॅस तयार होतो.
चपातीत ग्लूटेन नावाचा पदार्थ असतो, जो शरीरातील रक्ताची पातळी वाढवू शकतो.
यासाठी चपातीसोबत प्रथिने, भाज्या, फळे आणि दूध यांचा समावेश करा. विविध प्रकारचे आहार घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.