Food Adulteration : तुम्ही खाताय का भेसळयुक्त अन्न? होऊ शकतात हे गंभीर परिणाम

Team Agrowon

अन्नातील भेसळ ही भयंकर समस्या असून, त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

Food Adulteration | Agrowon

अलीकडे ग्राहकांमध्ये जागरूकता होऊ लागलेली असली तरी बहुतांश सामान्य लोकांपर्यंत भेसळीचे आरोग्यासाठी असलेले भीषण परिणाम अद्याप माहिती नाहीत.

Food Adulteration | Agrowon

अन्नातील भेसळ जुलाब, पोटदुखी, मळमळ, उलट्या, दृश्य विकार, डोकेदुखी, कर्करोग, अशक्तपणा, निद्रानाश, स्नायू पक्षाघात, मेंदूचे नुकसान, पोटाचे विकार, चक्कर येणे, सांधेदुखी, यकृत रोग, जलोदर, आतडे व पचनसंस्थेच्या समस्या, श्‍वासोच्छ्वासाच्या समस्यांशी जोडलेले आहे.

Food Adulteration | Agrowon

तीव्र व सातत्याने अन्न भेसळयुक्त आहारामुळे आतड्यांना सूजेसह हृदयविकाराच्या झटक्यापर्यंत परिणाम पोहोचू शकतात.

Food Adulteration | Agrowon

मेलामाइन हे नायट्रोजन-समृद्ध संयुग असून, दुधातील नैसर्गिक प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी दुधामध्ये मिसळले जाते. या मेलामाइनच्या सेवनामुळे मूत्रपिंड निकामी होणे, मूतखडे आणि मूत्रमार्गात संसर्ग होतात.

Food Adulteration | Agrowon

तेलाच्या भेसळीमुळे पित्ताशयाचा कर्करोग, जलोदर, काचबिंदू, दृष्टी कमी होणे, पक्षाघात, यकृत खराब होणे आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

Food Adulteration | Agrowon

काही भेसळयुक्त पदार्थांमुळे कर्करोग होण्याच्या शक्यता वाढतात. भेसळयुक्त अन्नाचे दीर्घकाळ सेवन मानवी शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरते.

Food Adulteration | Agrowon

Black Pepper : काळी मिरी कोणत्या रोगांपासून मुक्त करते? पाहा याचे फायदे...