Onion Storage Mistakes: कांदा साठवणुकीत तुम्हीही या चुका करताय? वेळीच सावध व्हा!

Swarali Pawar

साठवणीत दुर्लक्ष

कांदा साठवताना योग्य काळजी घेतली नाही तर मोठं नुकसान होतं. सोप्या गोष्टी पाळल्या तर सड आणि वजन घट सहज टाळता येते.

Onion Storage Tips | Agrowon

काढणीपूर्वी पाणी देणे

काढणीच्या १०-१५ दिवस आधी पाणी दिल्यास कांदा मऊ पडतो. असा कांदा साठवणीत लवकर खराब होतो.

Onion Storage Tips | Agrowon

अपरिपक्व कांदा काढणे

मान पूर्ण पडण्याआधी काढलेला कांदा टिकत नाही. असा कांदा साठवताना लवकर सडतो.

Onion Storage Tips | Agrowon

जास्त नत्र खत वापरणे

जास्त नत्रामुळे कांदा मऊ होतो आणि रोग वाढतात. यामुळे साठवणीत जास्त नुकसान होते.

Onion Storage Tips | Agrowon

नीट वाळवण न करणे

काढणीनंतर कांदा नीट वाळवला नाही तर ओलावा राहतो. तसेच मान जास्त लहान किंवा मोठी ठेवली तर समस्या होतात. ३-४ सेमी मान ठेवून कापणे योग्य ठरते.

Onion Storage Tips | Agrowon

जास्त उंच ढीग

४ फूटांपेक्षा जास्त उंच ढिगामुळे हवा खेळती राहत नाही यामुळे खालच्या कांद्यावर दाब येऊन सड वाढते.

Onion Storage Tips | Agrowon

चाळीजवळ जनावर बांधणे

कांद्याच्या चाळीजवळ जनावरं बांधू नये, किंवा गोठ्याजवळ चाळ बांधू नये. शेण आणि मूत्रामुळे कांदा खराब होतो.

Onion Storage Tips | Agrowon

युरियाशी संबंध

कांद्याच्या चाळीजवळ कधीच युरियाची साठवण करु नये. किंवा रिकाम्या चाळीतही खत साठवू नये. त्यामुळे कांद्याला पाणी सुटते आणि तो नासतो.

Onion Storage Tips | Agrowon

Orchard Management Practices: कडक उन्हात संत्रा बाग कशी वाचवाल? जाणून घ्या सोप्या टिप्स

अधिक माहितीसाठी...