Radhika Mhetre
ज्या बागेमध्ये सध्या प्रीब्लूम किंवा फुलोरा अवस्थेच्या जवळ किंवा मणी सेटिंग ते ४-८ मिलीमीटर मण्याची अवस्था आहे. अशा बागेमध्ये अवकाळी पावसामुळे फुलोरा गळ आणि मणी तडकून सडण्याचे प्रमाण वाढू शकतं. ते थांबविण्यासाठी तडकलेले मणी काढून टाकावेत.
मणी क्रॅकिंग रोखण्यासाठी कायटोसॅन २ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
द्राक्ष घडातील खराब झालेले मणी कात्रीच्या साह्याने काढून टाकावेत. लक्षात ठेवा हे काम मणी सडण्यापूर्वी करायच आहे. द्राक्ष मणी साफ केल्यानंतर ट्रायकोडर्मा २ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
बागेत साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित काढून द्यावे. त्यासाठी वेलीच्या ओळींमध्ये साधारणतः वीस ते पंचवीस सेंटिमीटर रुंद आणि १०-१५ सेंटिमीटर खोल अशी चारी घ्यावी.
वेलीचा जोम नियंत्रित करण्यासाठी पोटॅशिअमयुक्त खताचा वापर करावा.
बागेत मणी सडत असतील तर जमिनीवर कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. त्यामुळे माश्यांचे प्रमाण कमी राहते.
बुरशीजन्य रोगांचा संसर्ग टाळण्यासाठी वेली कोरड्या ठेवण्याचा प्रयत्न करावा.