Rabbit Farming : कमी भांडवलात करा ससे पालन व्यवसाय

Mahesh Gaikwad

पशुपालन

तुम्हाला पशुपालनाचा व्यवसाय करायचा आहे पण भांडवलाची कमी आणि मोठ्या पशुंसाठी जागेची अडचण असल्यास तुमच्यासाठी ससा पालन हा चांगला पर्याय ठरू शकतो.

Rabbit Farming | Agrowon

ससा पालन

ससा पालनासाठी जास्त जागेची गरज लागत नाही. घराच्या गच्चीवर, अंगणात किंवा शेतातील कुठल्याही छोट्या जागेत तुम्ही ससे पाळू शकता.

Rabbit Farming | Agrowon

कमी गुंतवणूक

विशेष म्हणजे ससा पालन व्यवसायासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात भांडवल असण्याची आवश्यकता नाही. अगदी कमी खर्चात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

Rabbit Farming | Agrowon

पिल्लू उत्पादन

सशाची मादी एकावेळी ५-७ पिल्लांना जन्म देते. त्यामुळे सशापासून पिल्लांचे उत्पादनही जास्त असते.

Rabbit Farming | Agrowon

मादी ससे

जर तुमच्याकडे १० मादी ससे असतील, तर एका वर्षांत साधारणपणे सरासरी तुम्हाला ६०-७० पिलांचे उत्पादन मिळते.

Rabbit Farming | Agrowon

लोकर उद्योग

फार्म ब्रिडिंग आणि लोकर उद्योगासाठी सशांची खरेदी केली जाते. याशिवाय काही ठिकाणी मांसासाठीही ससे वापरतात.

Rabbit Farming | Agrowon

कमी खर्च

ससे उरलेल्या भाज्या, गवत, घरातील धान्य खावून जगतात. त्यामुळे ससा पालनासाठी खर्चही कमी लागतो.

Rabbit Farming | Agrowon

छोटे शेतकरी

एकूणच इतर पशुंच्या तुलनेत सशांच्या देखभालीचा खर्च खूपच कमी असल्याने लहान शेतकरी सहज ससा पालन व्यवसाय करू शकतात.

Rabbit Farming | Agrowon