Anuradha Vipat
दिवाळीच्या सणात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरण बांधणे आणि आकाशकंदील लावणे ही आपली अत्यंत जुनी परंपरा आहे.
वास्तूशास्त्रानुसार, घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक ऊर्जेचा आणि माता लक्ष्मीचा प्रवेशमार्ग मानला जातो.
दिवाळीत योग्य नियमांनुसार तोरण आणि कंदील लावल्याने घरात सुख, समृद्धी, शांती आणि ऐश्वर्य नांदते.
वास्तूशास्त्रानुसार, दिवाळीला घराच्या मुख्य दारावर आंबा आणि अशोक या झाडांच्या पानात झेंडूची फुले गुंफून बनवलेले तोरण लावणे अत्यंत शुभ मानले जाते.
वास्तू नियमांनुसार, मुख्य दारावर प्लॅस्टिकच्या वस्तू लावल्याने सकारात्मक ऊर्जा रोखली जाते.
तोरण नेहमी दाराच्या चौकटीला अशा प्रकारे बांधावे की ते दाराच्या अगदी मधोमध येईल.
वास्तूशास्त्रानुसार, आकाशकंदील नेहमी घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणे सर्वात जास्त फलदायी मानले जाते.