Anuradha Vipat
आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. आजपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शेणाच्या गवळणी घालण्याची पद्धत आहे.
दिवाळीमध्ये शेणाच्या गवळणी करण्याची परंपरा कृषी संस्कृतीशी जोडलेली आहे.
आज आपण दिवाळीमध्ये शेणाच्या गवळणी करण्याचे काय महत्व व कारण आहे हे पाहूयात.
शेणाच्या गवळणी करुन बळीराजा आपल्या शेती आणि पशुधनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो
परंपरेनुसार शेणाच्या मूर्ती बनवून गायी आणि कृष्णाचे पूजन केले जाते.
दिवाळीत शेणाचे गोकुळ, त्यात गवळणी, पेंद्या आणि बळीराजाची मूर्ती मांडून पूजा केली जाते.
ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी गवळणी करण्याची प्रथा मोठ्या उत्साहात जपली जाते.