Anuradha Vipat
दिवाळीमध्ये तेलकट पदार्थांचे जास्त सेवन केल्याने चेहऱ्यावर टॅन वाढू शकते.
दिवाळीतील शॉपिंग आणि धावपळीमुळे चेहऱ्यावर मुरुमांची समस्याही वाढू शकते.
अशा वेळी घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता.चला तर मग ते उपाय कोणते आहे हे पाहूयात.
बेसन, हळद, आणि थोडे दूध किंवा गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे कोरडी होऊ द्या.
टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी धुवा. टोमॅटोमध्ये असलेले नैसर्गिक घटक टॅन कमी करण्यास मदत करतात.
लिंबाचा रस आणि मध हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटांनी धुवा.
कोरफडीचा गर आणि गुलाबपाणी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा. हे त्वचेला थंडावा देते आणि टॅन कमी करते.