Anuradha Vipat
दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रकाश आणि सजावटीचा उत्सव! दिवाळीत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्या जातात.
आज आम्ही तुम्हाला दिवाळीत काढण्यासाठी अशाचं काही रांगोळ्यांची सोपी डिझाईन्स सांगणार आहोत.
गुलाबाच्या पाकळ्या, झेंडू आणि आंब्याची पाने वापरून तुम्ही आकर्षक फुलांची रांगोळी तयार करु शकता
दाराच्या चौकटीभोवती आकर्षक बॉर्डर रांगोळी काढू शकता. ही रांगोळी कमी वेळेत आणि साध्या पद्धतीने काढता येते.
तुम्ही दाराच्या समोर लक्ष्मीच्या पाऊलखुणांची रांगोळी काढू शकता.
ठिपक्यांची रांगोळी सर्वात सोपी आणि सुंदर रांगोळी आहे.
साध्या रांगोळीत काही लहान दिवे किंवा मेणबत्त्या लावा.