Anuradha Vipat
सध्या प्रत्येकाच्या घरोघरी दिवाळी फराळची लगबग सुरु आहे. दिवाळी म्हणलं की फराळ हवातं ना!
दिवाळी फराळातील पदार्थांना खरा स्वाद आणि सुगंध देण्यासाठी घरगुती मसाले अतिशय महत्त्वाचे असतात.
आज आपण दिवाळी फराळ बनवताना कोणते घरगुती मसाले वापरावे याबद्दल जाणून घेऊयात.
चकली, चिवडा, शंकरपाळे अशा तिखट पदार्थांसाठी धने-जिरे पावडर उत्तम असते.
घरच्या घरी सुक्या लाल मिरच्या भाजून तयार केलेले तिखट अधिक रंगीत आणि सुगंधी असते.
हळद पदार्थांना सुंदर पिवळा रंग देते आणि शरीरातील सूज कमी करते.
तिळ-मोहरी मसाला चिवडा, पोहे, नमकीन अशा पदार्थांमध्ये वापरला जातो. यामुळे पदार्थ कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतात.