Anuradha Vipat
दिवाळी पाडवा हा हिंदू धर्मियांच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक अतिशय शक्तिशाली मुहूर्त मानला जातो.
ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रानुसार, या दिवशी विश्वामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सर्वाधिक असतो.
सकाळी अभ्यंगस्नानानंतर घराच्या मुख्य उंबऱ्याची (प्रवेशद्वाराची) हळद-कुंकू आणि अक्षता वाहून पूजा करा.
प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण नक्की लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.
जर तुम्हाला नवीन व्यवसाय, गुंतवणूक किंवा दुकान सुरू करायचे असेल, तर आजचा दिवस सर्वोत्तम आहे.
पत्नीने पतीला उटणे लावून स्नान घालावे आणि पाटावर बसवून त्याचे औक्षण करावे.
सकाळी ६:४० ते सकाळी ८:५० पर्यंत. (घराची पूजा आणि उंबरा पूजनासाठी उत्तम)