Anuradha Vipat
दिवाळीत घराचा मुख्य दरवाजा अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण याच मार्गाने माता लक्ष्मीचे घरात आगमन होते.
वास्तू शास्त्र आणि परंपरेनुसार, मुख्य दरवाजा जितका स्वच्छ, सुशोभित आणि प्रकाशमान असेल, तितकी घरात सकारात्मक ऊर्जा जास्त राहते.
ताजी पिवळी-केशरी झेंडूची फुले आणि आंब्याची किंवा अशोकाची पाने एकत्र करून सुंदर तोरण तयार करा.
दरवाजाच्या दोन्ही बाजूंना तेलाचे किंवा तुपाचे दिवे लावा. आधुनिक सजावटीसाठी तुम्ही दरवाजाच्या कडांना दुहेरी टेपच्या साहाय्याने लहान एलईडी फेअरी लाईट्स लावू शकता.
मुख्य दरवाजाच्या अगदी समोर किंवा दोन्ही बाजूंना सुंदर, साधी किंवा फुलांची रांगोळी काढा . रांगोळीमध्ये स्वास्तिक, कलश किंवा कमळाचे फूल काढावे.
दिवाळीच्या दिवशी उंबरठा स्वच्छ धुवून घ्यावा. त्यावर हळद-कुंकवाचे लेपन करावे किंवा हळदीची नऊ तिकिटे काढावीत.
मुख्य दरवाजाच्या बाजूला एका तांब्याच्या किंवा मातीच्या पसरट भांड्यात स्वच्छ पाणी भरा. त्या पाण्यात गुलाबाच्या किंवा झेंडूच्या पाकळ्या आणि लहान तरंगणारे दिवे सोडा.