Anuradha Vipat
दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. उद्या दिवाळीचा दूसरा दिवस आहे. दिवाळीला लक्ष्मीपूजनला विशेष महत्व आहे.
प्रत्येकजण आपापल्या घरी लक्ष्मीपूजन करत असतं. आज आपण पाहूयात घरातील लक्ष्मीपूजन करण्याची योग्य पद्धत.
घरात लक्ष्मीपूजन करण्यासाठी प्रथम घर स्वच्छ करा आणि पवित्र गंगाजल शिंपडा. पूजेच्या ठिकाणी गणपतीला नमस्कार करून, दिवा आणि धूप पेटवा.
लक्ष्मीला पंचामृताने स्नान घाला. नवीन वस्त्र आणि अलंकार अर्पण करा. लक्ष्मीला हळद-कुंकू लावा आणि कमळाचे फूल अर्पण करा.
'ॐ श्री महालक्ष्मी नमः' हा मंत्र ११ वेळा जप करा. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे आणि दूध-खव्याचा नैवेद्य अर्पण करा
लक्ष्मीची पावले आणि नवीन झाडूची पूजा करा. लक्ष्मीची आरती करा आणि नंतर पूजा झाल्यावर प्रसाद सर्वांना वाटा.
पूजेच्या दिवशी आणि नंतरही घरात सकारात्मक वातावरण ठेवा आणि वाद टाळा.