Diwali Faral Tips : यंदाचा फराळ होणार नाही कडक किंवा तेलकट; फराळ बनवताना फक्त 'या' गोष्टींची काळजी घ्या!

Anuradha Vipat

दिवाळीचा फराळ

दिवाळीचा फराळ हा सणाचा मुख्य आनंद असतो, पण तो बनवताना योग्य प्रमाण, तळण्याची पद्धत आणि साहित्याची निवड या गोष्टी पाळल्या नाहीत तर संपूर्ण मेहनत वाया जाऊ शकते.

Diwali Faral Tips | Agrowon

महत्त्वाची काळजी

फराळ परफेक्ट, खुसखुशीत आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी फराळ बनवताना खालील महत्त्वाची काळजी नक्की घ्या.

Diwali Faral Tips | Agrowon

नवीन साहित्याचा वापर

फराळासाठी लागणारे तेल, डाळीचे पीठ, मैदा आणि रवा नेहमी ताजा व चांगल्या दर्जाचा वापरा. जुन्या साहित्यामुळे फराळाला खवट वास येऊ शकतो.

Diwali Faral Tips | agrowon

साहित्य चाळून घेणे

मैदा, बेसन किंवा पिठीसाखर वापरण्यापूर्वी बारीक चाळणीने चाळून घ्या. यामुळे पिठात गाठी राहत नाहीत आणि पीठ हलके होते.

Diwali Faral Tips | agrowon

अचूक प्रमाण

चिवडा, चकली किंवा शंकरपाळीच्या पिठात घालण्यात येणारे कडकडीत तेलाचे किंवा तुपाचे मोहन अगदी मोजून टाका.

Diwali Faral Tips | agrowon

गॅसची आंच नियंत्रित ठेवणे

फराळ तळताना तेल आधी चांगले गरम करून घ्या, पण तळताना गॅस मध्यम ठेवा.

Diwali Faral Tips | agrowon

एकतारी पाक

रवा किंवा बुंदीचे लाडू बनवताना पाकाकडे विशेष लक्ष द्या. बऱ्याचदा लाडूंसाठी 'एकतारी' पाक लागतो.

Diwali Faral Tips | agrowon

Chicken vs Mutton : चिकन की मटण: आरोग्यासाठी नक्की काय आहे योग्य?

Chicken vs Mutton | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...