Anuradha Vipat
दिवाळीत गोड पदार्थ खाल्लले जातातचं पण त्याचं बरोबर तिखट पदार्थही तितक्याचं आवडीने खाल्लले जातात.
आज आपण दिवाळी फराळातील कुरकुरीत चकली कशी बनवायची याची सोपी रेसिपी पाहूयात.
दिवाळीच्या फराळाची सुरुवात चकलीने करा. चकली दिवाळीतील एक लोकप्रिय आणि आवडीचा पदार्थ आहे.
तांदूळ - २ ½ कप,हरभऱ्याची डाळ - १ कप, मूग डाळ - ½ कप, उडीद डाळ - ½ कप, पोहे - ½ कप, धणे - २० ग्रॅम, जिरे - २० ग्रॅम.
तांदूळ, हरभरा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, पोहे, धणे आणि जिरे स्वच्छ धुऊन घ्या आणि वाळवून भाजून घ्या. नंतर सर्व साहित्य बारीक दळून घ्या.
चकली भाजणी घ्या. त्यात लाल तिखट, हळद, जिरे पूड, धणे पूड , तीळ आणि चवीनुसार मीठ घालूव. आवश्यकतेनुसार गरम पाणी आणि तेल घालूव पीठ घट्टसर होईल असे मळून घ्या.
चकलीच्या आकारात पिठाच्या वड्या करा आणि गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळा. चकली तयार आहे