Anuradha Vipat
वास्तू शास्त्रात घराच्या उंबऱ्याला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे.
उंबरा हा घरातील सकारात्मक ऊर्जा आत ठेवतो आणि नकारात्मक शक्तींना बाहेरच रोखतो.
दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा धनत्रयोदशीला उंबऱ्याची विधीवत पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते व घरात अखंड दारिद्र्य दूर होऊन सुख-समृद्धी येते.
दिवाळीमध्ये धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन या दोन्ही दिवशी उंबऱ्याची मुख्य पूजा केली जाते. ही पूजा सकाळी सूर्योदयानंतर आणि संध्याकाळी प्रदोष काळात करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
सकाळी उठल्यावर घराचा उंबरा पाण्याने किंवा गोमूत्र शिंपडून पूर्ण स्वच्छ पुसून घ्यावा. उंबऱ्यावर हळद-कुंकवाचे पाणी करून लेपन करावे. त्यानंतर उंबऱ्याच्या दोन्ही बाजूंना सुंदर रांगोळी काढावी.
उंबऱ्याच्या मध्यभागी किंवा दोन्ही बाजूंना हळद-कुंकवाने 'स्वास्तिक' आणि 'शुभ-लाभ' लिहावे.
उंबऱ्याला हळद, कुंकू, आणि अक्षता वाहून नमस्कार करावा. झेंडूचे फूल आणि आंब्याचे पान तिथे अर्पण करावे.