Anuradha Vipat
दिवाळी हा हिंदू धर्मातील प्रमुख आणि सर्वात आनंददायी सण आहे. दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दिवाळीत घरे दिवे, मेणबत्त्या आणि विविधरंगी दिव्यांनी सजवली जातात. पण दिवाळीत दिवे का लावले जातात त्याचे महत्व काय आहे हे माहिती आहे का?
दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि दिवे लावून आपण वाईट आणि अज्ञानावर चांगल्याचा विजय साजरा करतो.
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या काळात दिवे लावल्याने घरात देवी लक्ष्मीचे स्वागत होते
दिवाळीच्या काळात दिवे लावल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते असे मानले जाते.
दिवाळीच्या परंपरेनुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी यमदीपम लावला जातो
यमदीपम लावणे म्हणचे आपल्यावर यमाची कृपा होणे आणि अकाली मृत्यू टाळता येणे