Anuradha Vipat
दिवाळीचा सण जवळ आला आहे. घरात साफसफाई आणि स्वच्छता असणे गरजेचे आहे. दिवाळी हा देवी लक्ष्मीचा सण आहे.
दिवाळीत घराची स्वच्छता करण्यासाठी आम्ही दिलेल्या 'या' टिप्स तुम्हाला साफसफाई करण्यास मदत करतील.
एकाच वेळी संपूर्ण घर स्वच्छ करण्याएवजी दररोज फक्त एक किंवा दोन खोल्या स्वच्छ करा. यामुळे थकवा कमी होईल .
दिवाळीची स्वच्छती करताना अनावश्यक असणाऱ्या वस्तू काढून टाका. घर जितके रिकामे असेल तितकी साफसफाई करणे सोपे होईल.
जर तुम्हाला साफसफाईचा वेळ वाचवायचा असेल तर मायक्रोफायबरचा वापर करा.
वेगवेगळे क्लीनर वापरण्याऐवजी एक चांगला मल्टि प्रपोज क्लीनर घ्या.
दिवाळीच्या साफसफाईसाठी खिडक्यांच्या काचा स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि मिठाचा वापर करा.