Anuradha Vipat
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली की घरात सगळीकडे साफसफाईची लगबग सुरू होते.
काम सोपे करण्यासाठी आणि कमी कष्टांत घर चकाचक करण्यासाठी साफसफाईचा योग्य क्रम आणि अचूक प्लॅनिंग खालीलप्रमाणे आहे.
छताचे कोळी , छताचे पंखे, ट्युबलाईट्स आणि कपाटांचे सर्वात वरचे भाग आधी साफ करा.
कपाटांचे खालचे कप्पे, खिडक्या, सोफा आणि सर्वात शेवटी जमीन झाडून पुसून घ्या.
घरातील सर्वात शेवटची खोली आणि कपाटांच्या आतील भाग आधी आवरा.
मुख्य दिवाणखाना (लिव्हिंग रूम), बाल्कनी आणि शेवटी पाण्याचा वापर करून बाथरूम व मुख्य दरवाजा स्वच्छ करा.
साफसफाई सुरू करण्याच्या एक दिवस आधीच घरातील जड पडदे, सोफा कव्हर्स धुवायला टाका, जेणेकरून शेवटच्या दिवशी ते वाळून तयार असतील.