Anuradha Vipat
दिवाळीची सगळीकडे धामधूम आहे. दिवाळीत फराळाला विशेष महत्व आहे. आज आपण दिवाळी फराळातील करंजी कशी बनवायची याची सोपी रेसिपी पाहूयात.
कुरकुरीत करंजी खाणं सर्वांनाचं आवडतं. तोंडात टाकता क्षणीचं करंजी विरघळायला हवी.पाहूयात कुरकुरीत करंजी रेसिपी.
मैदा, बारीक रवा, मीठ, तूप , पाणी गरजेनुसार, किसलेले सुके खोबरे, पिठीसाखर, बारीक रवा, वेलची पूड.
मैदा, रवा, मीठ आणि पातळ तूप एकत्र करून पाणी घालून घट्टसर कणिक मळून घ्या.
किसलेले खोबरे, पिठीसाखर आणि रवा घेऊन ते एकत्र चांगले मिसळून घ्या. यात वेलची पूड घाला
कणकेचे छोटे गोळे करुन पातळ पोळी लाटा. पोळीच्या मध्यभागी सारण भरा आणि करंजीचा आकार द्या.
गरम तेलात करंज्या सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तयार झालेल्या करंज्या सर्व्ह करा.