Anuradha Vipat
दिवाळीची मंगलमय सुरुवात करणाऱ्या वसुबारस या दिवसाला हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात अत्यंत पवित्र मानले गेले आहे.
जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचण असेल, नशिबाची साथ मिळत नसेल किंवा घरात सतत कलह होत असतील, तर वसुबारसच्या दिवशी केलेले काही ज्योतिषीय तोडगे अत्यंत प्रभावी ठरतात.
वसुबारसच्या दिवशी सकाळी पहिली पोळी गाईसाठी काढावी. त्या पोळीवर थोडे गाईचे तूप आणि गूळ ठेवून ती पोळी सवत्स गाईला स्वतःच्या हाताने खायला घालावी.
ज्या लोकांवर कर्जाचा बोजा वाढला आहे किंवा ज्यांचे पैसे कुठे अडकले आहेत, त्यांच्यासाठी हा उपाय उत्तम आहे.
वसुबारसच्या दिवशी गाईच्या कपाळावर हळदीचा टिळा लावावा. तसेच गाईला सुवासिक फुलांची माळ घालून भिजवलेली हरभरा डाळ आणि गूळ खायला द्यावा. यामुळे विवाहाचे योग लवकर जुळून येतात.
वसुबारसच्या दिवशी घराच्या मुख्य दारासमोर हळद-कुंकवाचा वापर करून 'गोपद्म काढावीत. ही पावले बाहेरून घराच्या आत येताना दाखवावीत.
वसुबारसच्या दिवशी गाईला हिरवा चारा खायला घातल्यानंतर तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवावा आणि गाईला एकूण ४ प्रदक्षिणा माराव्यात. प्रदक्षिणा मारताना "ॐ नमो भगवते वासुदेवाय" या मंत्राचा जप करावा.