Anuradha Vipat
दिवाळी हा केवळ रोषणाईचा सण नसून आर्थिक अडचणी आणि कर्जबाजारीपणातून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत शुभ काळ मानला जातो.
वास्तू शास्त्रानुसार, दिवाळीच्या दिवसांत केलेल्या काही विशेष उपायांनी घरातील धन राहू-केतूचे दोष दूर होतात.
घराच्या किंवा दुकानाच्या उत्तर दिशेला दिवाळीच्या पाचही दिवस एक निळ्या रंगाचा बल्ब किंवा दिवा लावावा. ही कुबेराची दिशा आहे.
उत्तर दिशेच्या कोपऱ्यात एका काचेच्या वाटीत अख्खे खडे मीठ भरून ठेवा. हे मीठ दर आठवड्याला बदला.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लाल कपड्यावर ५ पिवळ्या कवड्या आणि ५ गोमती चक्र ठेवून त्यांची पूजा करा. पूजा झाल्यावर हा कपडा बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा.
लक्ष्मी पूजनाच्या वेळी दोन मोठे दिवे लावा. एक दिवा गायीच्या तुपाचा आणि दुसरा मोहरीच्या तेलाचा असावा.
दिवाळीच्या दिवशी एका काळ्या कपड्यात तुरटीचा तुकडा बांधून तो घराच्या मुख्य दरवाजावर आतल्या बाजूने लटकवा.