Anuradha Vipat
दिवाळीच्या आणि विशेषतः धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर विशिष्ट वस्तूंची खरेदी करणे अत्यंत पवित्र मानले जाते.
हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तूशास्त्रानुसार, या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू घरात सकारात्मक ऊर्जा आणतात आणि संपत्तीत अनेक पटीने वाढ करतात.
धनत्रयोदशी किंवा पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीची नाणी किंवा दागिने खरेदी केल्याने वर्षाकाठी घरात धनलाभाचे योग बनतात.
दिवशी पितळ किंवा तांब्याची भांडी खरेदी करणे अत्यंत शुभ असते. यामुळे घरात अन्न आणि आरोग्याची कमतरता भासत नाही.
दिवाळीच्या खरेदीत एक नवीन झाडू आवर्जून खरेदी करावा. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्याची पूजा केल्याने घरातील दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते.
धनत्रयोदशीच्या दिवशी अख्खे धने खरेदी करून ते लक्ष्मी पूजनात ठेवावेत. पूजेनंतर हे धने घरातील बागेत किंवा कुंडीत पेरावे.
दिवाळीच्या दिवशी ५ किंवा ११ गोमती चक्र आणि पिवळ्या कौड्या खरेदी करून पूजा करावी.