Garlic Health Benefits : जंतूनाशक लसूण अनेक आजारावर गुणकारी ; जाणून घ्या फायदे

Team Agrowon

लसूण हा वातशामक म्हणून कार्य करतो. सांधेदुखी, सायरीका, पाठदुखी अशी वाताची लक्षणे असतील तर आहारात लसणाचा वापर जरूर करावा.

Garlic Health Benefits | Agrowon

सर्दी, खोकला, श्‍वास अशा कफ विकारात लसूण पिंपळी चूर्णाचा उपयोग करावा. ह्रदयरोग, दमा, कफाचा खोकला असे त्रास जाणवत असल्यास, आहारात तुपात तळलेला लसणाचे सेवन करावे.

Garlic Health Benefits | agrowon

अतिसार, आर पडणे यामध्ये पोटात मुरडा येतो. अशा वेळी लसणापासून तयार केलेली ‘लसूनादी वटी’ योग्य मात्रेत तुपात कालवून घेतल्यास मुरडा कमी होतो.

Garlic Health Benefits | agrowon

अन्नपचन नीट झाले नसेल तर, पोटात जडपणा जाणवतो. शिवाय अंग दुखते. विशेषतः व्ह्रमॅटॉईड आर्थायरीस मध्ये ताप, पचनशक्ती बिघडणे, सांधे धरणे या तक्रारी असतात. त्यावेळी इतर औषधांच्या जोडीला लसूण जरूर वापरावा.

Garlic Health Benefits | Agrowon

लसूण उत्तम जंतूनाशक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे लहान मुलांच्या आहारातून लसणाचा वापर जरूर करावा.

Garlic Health Benefits | agrowon

श्‍वास विकार, फुफ्फसाचे विकार, क्षय इत्यादी आजारांमध्ये लसूण तुपात लालसर तळून दिला जातो. त्यामुळे कफाची दुर्गंधी, कफातील दोष कमी होण्यास मदत होते. तसेच इतर औषधांचा वापरही करावा.

Garlic Health Benefits | agrowon

गर्भवती स्त्रियांना लसूण अति प्रमाणात देऊ नये. त्यामुळे उष्णता वाढते. उष्णता वाढली तर धने उकडून द्यावेत.

Garlic Health Benefits | agrowon

Compost Fertilizer : कंपोस्ट खत तयार करण्याची सोपी पद्धत

आणखी पाहा...