Team Agrowon
बिब्बा झाडाचा प्रत्येक भाग औषधी दृष्टिकोनातून उपयुक्त असून त्याचा उपयोग विविध आजारांवर केला जातो.
बिब्बा ही वनस्पती उष्ण व तीव्र गुणधर्माची आहे. त्यामुळे तिचा वापर करण्यापूर्वी शुद्धीकरण करणे अत्यावश्यक असते. बिब्ब्याच्या बींमध्ये असणारे बिब्बावनॉल हे घटक त्वचेवर फोड, पुरळ, जळजळ निर्माण करू शकतात.
बिब्ब्याच्या पानांचा उपयोग पचन सुधारण्यासाठी, ज्वर कमी करण्यासाठी, तसेच त्वचारोगांवर लेप स्वरूपात केला जातो. यामध्ये अॅण्टीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात.
बिब्याचे फळ म्हणजेच बी विविध आजारांवर आयुर्वेदात वापरले जाते. ही मूळव्याध, कुष्ठरोग, त्वचारोग, संधिवात, मधुमेह, कॅन्सर, कृमिरोग, वायू विकार, रक्तअल्पता यावर प्रभावी आहे.
बिब्ब्याच्या बीपासून मिळणारे तेल त्वचारोग, सांधेदुखी, फोडांवर बाहेरून लावण्यासाठी वापरले जाते.
बिब्ब्याचे फूल डोळ्यांच्या विकारावर वापरली जातात.
बिब्ब्याच्या झाडाच्या सालीतून येणारा गोंद मानसिक थकवा, लैंगिक दुर्बलता, आणि त्वचारोगांवर उपयोग होतो.
बिब्ब्याच्या फळाचा गर जंतुनाशक आणि कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. मात्र, तो विषारी असल्यामुळे शुद्धीकरण करूनच वापर करावा.
Sugarcane Trash Management : उसाचे पाचट वेळेवर काढा ; एवढे फायदे होतात