Deepak Bhandigare
डिजीटल ७/१२, ८ अ आणि फेरफार उताऱ्यांना अधिकृत मान्यता मिळाली आहे
यामुळे डिजीटल सातबारा उताऱ्याला कायद्याचे संरक्षण मिळाले आहे
आता केवळ १५ रुपयांत अधिकृत उतारा मिळणार
तलाठ्याच्या सही-स्टॅम्पची गरज संपली
डिजीटल स्वाक्षरी, क्यूआर कोड आणि १६ अंकी पडताळणी क्रमांक असलेले ७/१२, ८ अ व फेरफार उतारे सहज मिळणार
असे उतारे सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग आणि न्यायालयीन कामांसाठी वैध
याआधी अधिकृत सातबारा उताऱ्यासाठी तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या
आता सरकाच्या या निर्णयामुळे कागदपत्रांसाठी लागणारा वेळ वाचणार