Hing Benefits : पाचक, खमंग हिंग औषध म्हणूनही उपयोगी

Team Agrowon

आपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी हिंग तर लागतोच. त्यामुळे प्रत्येक घरी हिंगपूड असते.

Hing Benefits | Agrowon

पदार्थाची रुची वाढविण्यासाठी, खमंगपणा येण्यासाठी हिंग उपयोगी पडतो. औषध म्हणूनही हिंग तेवढाच उपयोगी आहे.

Hing Benefits | Agrowon

हिंग अत्यंत पाचक म्हणून काम करतो. जेवणामध्ये गोड ताजे ताक आणि त्यात हिंग घालून घेतल्यास पचन सुधारते.

Hing Benefits | Agrowon

हिंगाचा समावेश असणारे हिंगाष्टक चूर्ण भूक वाढवते, पोटातले गॅसेस कमी करते; पण घेण्याची पद्धत मात्र जाणून घेतली पाहिजे.

Hing Benefits | Agrowon

जर भूक लागत नसेल तर जेवणात पहिल्या घासाबरोबर हिंग्वाष्टक चूर्ण तुपासह घ्यावे. जर पोट दुखत असेल तर जेवणानंतर हिंग्वाष्टक चूर्ण पाव चमचा प्रमाणात गरम पाण्यातून घ्यावे.

Hing Benefits | Agrowon

पोटात खूप दुखत असेल आणि गॅसेसमुळे दुखत असेल तर हिंगाचा गरम लेप पोटावर नाभीभोवती लावावा. त्यासाठी हिंग पाण्यात कालवून गरम करावा.

Hing Benefits | Agrowon

आपल्या रोजच्या वापरातील हिंग औषध म्हणून वापरला तर निश्‍चितच लहानसहान तक्रारींना आराम पडू शकतो.

Hing Benefits | Agrowon
आणखी पाहा....