Anuradha Vipat
वजन कमी करण्यासाठी आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी घरी डाएट सूप बनवणे अत्यंत सोपे आहे.
खालील सोप्या पद्धतीचा वापर करून तुम्ही चवदार आणि पौष्टिक डाएट मिक्स व्हेज सूप बनवू शकता.
१ कप बारीक चिरलेला कोबी, अर्धा कप गाजर, अर्धा कप ढोबळी मिरची , १/४ कप हिरवे मटार आणि ३-४ फरसबी.
१ छोटा चमचा बारीक चिरलेले आले, ४-५ लसूण पाकळ्या , १ छोटा कांदा, काळी मिरी पावडर , चवीनुसार मीठ, ऑलिव्ह ऑईल किंवा साजूक तूप, कोथिंबीर आणि पाणी.
एका कढईत किंवा पॅनमध्ये १ छोटा चमचा ऑलिव्ह ऑईल किंवा तूप गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेले आले आणि लसूण टाकून १ मिनिट परतून घ्या.
कांदा परतून झाल्यावर सर्व चिरलेल्या भाज्या कढईत टाका आणि मध्यम आचेवर २ ते ३ मिनिटे चांगल्या परतून घ्या. भाज्या परतून झाल्यावर त्यात २ ते ३ कप पाणी घाला.
कढईवर झाकण ठेवा आणि सूपला मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे चांगली उकळी येऊ द्या, जेणेकरून भाज्यांचा अर्क पाण्यात उतरेल. सूप थोडे घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. वरून बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर टाका.