Anuradha Vipat
शरीरातील चयापचय क्रिया म्हणजेच 'मेटाबॉलिझम' मंदावल्यास खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर न होता चरबी साठू लागते.
प्रोटीन पचवण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे आहारात अंडी, डाळी आणि पनीरचा वापर वाढवा.
दिवसभरात पुरेसे पाणी पिल्याने चयापचय क्रिया तात्पुरती १० ते ३० टक्क्यांनी वाढते.
ग्रीन टी आणि कॉफीमध्ये असणारे अँटी-ऑक्सिडंट्स आणि कॅफिन फॅट बर्निंग प्रक्रियेला गती देतात आणि मेटाबॉलिझम ४ ते ५ टक्क्यांनी वाढवण्यास मदत करतात.
जेवणामध्ये लवंग, काळी मिरी आणि प्रामुख्याने मिरचीचा वापर करा
रात्रभर रिकाम्या पोटी राहिल्यानंतर सकाळी सकस नाश्ता न केल्यास शरीर ऊर्जेची बचत करण्यासाठी मेटाबॉलिझम मंद करते.
एकाच वेळी जास्त जेवण्याऐवजी दर ३ ते ४ तासांनी थोडे थोडे खाल्ल्याने शरीराची पचनसंस्था सतत कार्यरत राहते आणि मेटाबॉलिझमचा स्तर टिकून राहतो.