Benefits Of Amla : आरोग्याचा पॉवरहाऊस 'आवळा'! थंडीत शरीराला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी असा करा वापर

Anuradha Vipat

औषध

हिवाळ्याच्या ऋतूत बाजारात मोठ्या प्रमाणात येणारा आवळा हा आरोग्यासाठी औषध मानला जातो.

Benefits Of Amla | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-सी आढळते, जे हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि संसर्गापासून संरक्षण करते.

Benefits Of Amla | Agrowon

सर्दी-खोकल्यापासून आराम

थंडीच्या दिवसांत थंड हवेमुळे होणारा सर्दी, खोकला आणि घशातील खवखव यांसारख्या समस्यांवर आवळा किंवा आवळ्याचा रस मधासोबत घेतल्यास आराम मिळतो.

Benefits Of Amla | agrowon

पचनक्रिया

आवळ्यामध्ये असलेल्या फायबरमुळे हिवाळ्यात मंदावलेली पचनक्रिया सुधारते. यामुळे बद्धकोष्टता आणि गॅसच्या समस्येपासून सुटका मिळते.

Benefits Of Amla | Agrowon

त्वचा चमकदार होते

आवळ्याचे रोज सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार व मऊ होते.

Benefits Of Amla | Agrowon

केसांचे आरोग्य

आवळ्यातील पोषक घटक केसांची मुळे मजबूत करतात. हिवाळ्यात उद्भवणारी कोंड्याची समस्या दूर करून केस गळती रोखण्यासाठी आवळा गुणकारी ठरतो.

Benefits Of Amla | agrowon

वजन

आवळा शरीरातील चयापचय क्रिया वेगवान करतो. यामुळे हिवाळ्यात वाढणारे वजन नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होते.

Benefits Of Amla | Agrowon

Horoscope 26 July 2026 : 'या' राशीच्या लोकांना महत्त्वाची कामे रखडल्याने जाणवू शकते मानसिक अस्वस्थता

Horoscope 26 July 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...