Roshan Talape
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते, त्यामुळे योग्य आहार व जीवनशैली अत्यंत महत्त्वाची ठरते.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी थंड आणि हलका आहार घ्यावा. यात थंड फळांचा आणि भाजीपाल्याचा समावेश करावा.
पाणी, नारळपाणी, ताक किंवा फळांचा रस पिणे शरीराला थंडावा देतात आणि हायड्रेशन टिकवून ठेवतात. त्यामुळे दररोज आहारात द्रव पदार्थांचा समावेश करा.
उन्हाळ्यात योग्य झोप आणि विश्रांती अत्यंत आवश्यक असते. ती शरीरातील थकवा कमी करण्यास मदत करते.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी बाहेर पडताना सूती आणि सैलसर कपडे घालावेत. यामुळे उन्हापासून संरक्षण मिळते आणि शरीराला आराम मिळतो.
उन्हापासून संरक्षित राहण्यासाठी बाजारातील रंगीत कोल्ड्रिंक्स टाळावे, कारण त्यात केमिकल्स आणि साखरेचे प्रमाण जास्त असते, जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात.
तसेच या काळात तळलेले आणि तेलकट पदार्थ टाळावेत, कारण हे पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात. अशा अन्नापासून शक्य तितकं दूर राहणं शरीरासाठी योग्य ठरते.
सकाळी लवकर किंवा संध्याकाळी हलकं वर्कआउट करणे शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतो. यामुळे उष्णतेचा ताण कमी होतो आणि व्यायाम अधिक प्रभावी होतो.