Mahesh Gaikwad
लहानपणी आपण कधीना कधी तरी झाडाची बोरे पाडून खाल्ली असतीलच. बोर हे हे असे फळ आहे, जे भारतातल्या प्रत्येक गावात असतेच.
बोरे खायची इच्छा झाल्यास गावभर त्याचे झाड शोधत फिरणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील.
पण तुम्ही आजपर्यंत अनेकवेळा बोरे खाल्ली असतील, पण तुम्हाला त्याचे फायदे माहित आहेत का?
बोरांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन-सी असते. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
बोरामध्ये असणारा नायट्रिक ऑक्साईड हा घटक ब्लड फ्लो ठेवण्यास मदत करतो.
याशिवाय बोरे खाण्याने उच्च रक्तदाबसुध्दा नियंत्रणात राहण्यास फायदा होतो.
बोरामधील फायटोकॉन्सिट्यूएंट्समुळे ह्रदय विकाराचा धोका कमी होण्यासह त्यापासून तुमचा बचाव करते.
बोरामध्ये असणाऱ्या मॅग्नेशिअम, मँगेनिज आणि पोटॅशिअममुळे हाडे मजबूत होतात. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.