Anuradha Vipat
धनत्रयोदशी ज्याला धनतेरस असेही म्हणतात, धनत्रयोदशी हा दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवाचा पहिला दिवस आहे.
धनत्रयोदशी या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान कुबेर, भगवान गणेश आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते
आज आपण धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल जाणून घेणार आहोत.
धनत्रयोदशीच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देणे किंवा कर्ज देणे टाळावे.
धनत्रयोदशीच्या दिवशी मांस, मद्य किंवा इतर तामसिक पदार्थ खाणे टाळावे.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, नवीन भांडी किंवा इतर धातूच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.
धनत्रयोदशीला भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यास सुख-समृद्धी लाभते.