Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक नियमांनुसार, धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी काही विशिष्ट वस्तू खरेदी करणे अत्यंत अशुभ मानले जाते. नकळत केलेल्या या चुकांमुळे माता लक्ष्मी रुष्ट होऊ शकते आणि घरात दरिद्रता किंवा गरिबी येऊ शकते.
धनत्रयोदशी हा माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांचा सण आहे. या दिवशी लोखंड किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते .
वास्तुशास्त्रानुसार, धनतेरसला धारदार वस्तू घरात आणल्याने घरातील सदस्यांमध्ये क्लेश, भांडणे वाढतात आणि कुटुंबात अशांती निर्माण होते.
धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर काचेची भांडी, काचेचे शो-पीस किंवा इतर वस्तू खरेदी केल्याने घरात राहूचा दोष निर्माण होऊन आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते.
धनत्रयोदशी हा समृद्धीचा उत्सव असल्याने या दिवशी काळ्या रंगाचे कपडे, पादत्राणे किंवा कोणतीही काळी वस्तू खरेदी करू नये.
धनतेरसला प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते; यामुळे घरात बरकत राहत नाही.
जर तुम्ही धनत्रयोदशीला तांबे, पितळ किंवा चांदीची भांडी खरेदी करत असाल, तर ती भांडी घरात आणताना रिकामी आणू नका