Dhanteras Wealth Remedies : पैशांची चणचण दूर करण्यासाठी धनत्रयोदशीला करा हे खास उपाय; कायमचा दूर होईल दारिद्र्य!

Anuradha Vipat

महामुहूर्त

धनत्रयोदशी हा सण केवळ खरेदीचा नसून आर्थिक समृद्धी आणि सुख-शांती मिळवण्याचा महामुहूर्त मानला जातो.

Dhanteras Wealth Remedies | agrowon

सोपे आणि अत्यंत प्रभावी

जर कर्जाचा डोंगर वाढला असेल तर धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर ज्योतिषशास्त्रातील काही सोपे आणि अत्यंत प्रभावी उपाय नक्की करून पाहा.

Dhanteras Wealth Remedies | agrowon

१ रुपयाचे नाणे आणि लवंग

आज संध्याकाळी लक्ष्मी-कुबेर पूजनाच्या वेळी १ रुपयाचे नाणे गंगाजलाने स्वच्छ करून त्यावर कुंकवाचा टिळा लावा. पूजेनंतर हे नाणे आणि एक अखंड लवंग एका लाल कपड्यात बांधून त्याची लहान पोटली बनवा.

Dhanteras Wealth Remedies | agrowon

अख्खे धणे आणि मातीचा दिवा

धनतेरसला ५ रुपयांचे अख्खे धणे खरेदी करा. एका मातीच्या दिव्यामध्ये हे धणे आणि १ रुपयाचे नाणे ठेवून त्याची पूजा करा. दिवाळी पूर्ण झाल्यावर हे नाणे तिजोरीत ठेवा आणि धणे घराच्या अंगणातील कुंडीत पेरा.

Dhanteras Wealth Remedies | agrowon

झाडू खरेदी करा आणि दान

धनत्रयोदशीला विषम संख्येत म्हणजेच ३ गवताचे झाडू खरेदी करा. या झाडूंची घरी पूजा करा. त्यानंतर उद्या पहाटे सूर्योदयापूर्वी यातील एक झाडू शांतपणे कोणत्याही मंदिरात नेऊन गुपचूप दान करा.

Dhanteras Wealth Remedies | agrowon

चौमुखी दिवा

धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी पिठाचा एक चौमुखी दिवा बनवा. त्यात मोहरीचे किंवा तिळाचे तेल टाकून तो दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावा.

Dhanteras Wealth Remedies | agrowon

गोमती चक्र आणि कवड्यांचा उपाय

आजच्या दिवशी सराफा दुकानातून किंवा पूजेच्या दुकानातून ११ गोमती चक्र आणि ११ पिवळ्या कवड्या खरेदी करा. लक्ष्मी पूजेच्या वेळी त्यावर हळद-कुंकू वाहून त्यांची पूजा करा. दुसऱ्या दिवशी हे सर्व साहित्य एका पिवळ्या कपड्यात बांधून घराच्या मुख्य लॉकरमध्ये ठेवा.

Dhanteras Wealth Remedies | agrowon

Yama Deepam 2026 : धनत्रयोदशी २०२६ यमदीपदान: जाणून घ्या अचूक वेळ, शुभ मुहूर्त आणि पद्धत

Yama Deepam 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...