Dhanteras Puja Samagri : धनत्रयोदशीच्या पूजेत 'या' गोष्टींचा नक्की समावेश करा; वर्षभर राहील माता लक्ष्मीची अखंड कृपा!

Anuradha Vipat

अत्यंत पावन दिवस

धनत्रयोदशी हा सण सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळवण्याचा अत्यंत पावन दिवस मानला जातो.

Dhanteras Puja Samagri | agrowon

प्रिय वस्तू

आज धनत्रयोदशीच्या पूजेदरम्यान ज्योतिषशास्त्रात आणि पुराणात सांगितलेल्या काही अत्यंत प्रिय वस्तूंचा समावेश केल्यास माता लक्ष्मी आणि कुबेर देव प्रसन्न होतात.

Dhanteras Puja Samagri | agrowon

भगवान धन्वंतरी आणि लक्ष्मी-कुबेरांची मूर्ती

धनत्रयोदशीचे मुख्य देव आरोग्याचे दाते भगवान धन्वंतरी आहेत. त्यामुळे पूजेत माता लक्ष्मी आणि कुबेर देवांसोबत भगवान धन्वंतरीच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची स्थापना नक्की करा.

Dhanteras Puja Samagri | agrowon

१ रुपयाचे नाणे

पूजेच्या पाटावर चांदीचे किंवा १ रुपयाचे तांब्याचे नाणे ठेवून त्यावर कुंकवाचा टिळा लावा. हे नाणे संपन्नतेचे प्रतीक मानले जाते.

Dhanteras Puja Samagri | agrowon

पिवळ्या कवड्या

कवड्या समुद्रमंथनातून प्रकट झाल्या होत्या आणि त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. पूजेत किमान ५ किंवा ११ पिवळ्या कवड्या ठेवून त्यांची पूजा करा.

Dhanteras Puja Samagri | agrowon

कमळाचे फूल किंवा लाल फुले

माता लक्ष्मीचे आसन कमळ आहे. पूजेमध्ये त्यांना कमळाचे फूल किंवा लाल रंगाची जास्वंद, गुलाबाची फुले अर्पण केल्याने त्या लवकर प्रसन्न होतात.

Dhanteras Puja Samagri | agrowon

पितळेचा कलश किंवा भांडे

आज खरेदी केलेले पितळेचे भांडे किंवा कलश पाण्याने भरून त्यात अक्षता आणि नाणे टाकून पूजेच्या ठिकाणी मांडावे.

Dhanteras Puja Samagri | agrowon

Instant Mawa Barfi : इन्स्टंट मावा बर्फी: दुधाच्या पावडरीपासून बनवा तोंडात विरघळणारी मऊ बर्फी, कधीही न बिघडणारी रेसिपी!

Instant Mawa Barfi | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...