Swapnil Shinde
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन
समितीची बैठक झाली.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये २१ दिवस पावसांचा खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे
विमा कंपनीच्या नियमानुसार पीक लागवडीपासून २१ ते २५ दिवस पावसाने दडी मारल्यास शेतकऱ्यांना २५ टक्के आग्रीम पीक विमा रक्कम देण्यात येते
दिवाळीच्या पूर्वी सर्व शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याची रक्कम देण्यासाठी सरकार संपूर्ण प्रयत्न करत
बीडमध्ये 212 लाभार्थ्यांना शासनाच्या कृषी योजनेत विविध प्रकारचे लाभ मिळाले आहेत
यावेळी ४० लाभार्थ्यांना धनंजय मुंडे यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आलं.
धनंजय मुंडे हे लहान असताना त्यांच्याकडे ज्या कंपनीचा ट्रॅक्टर होता, आज त्याच कंपनीचा ट्रॅक्टर पाहून धनंजय मुंडे यांना तो चालवण्याचा मोह आवरता आला नाही.